Thursday, 19 July 2018

जमीन घोटाळ्याबाबत विरोधकांनी केलेले 'ते' भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेना मंत्र्यांनी फेटाळले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपपाठोपाठ आता शिवसेना मंत्र्यांवरही घोटाळ्याचे आरोप होत आहेत. एमआयडीसीच्या जमीनबाबत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाईंवर घोटाळ्याचे आरोप केले.

या आरोपांबाबत विधानसभेत चर्चा झाली. देसाईंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले.

 

विरोधकांच्या या आरोपांना सुभाष देसाईंनीही उत्तर दिले. सुभाष देसाईंनी विरोधकांचा जमीन घोटाळ्याचा आरोप फेटाळला.

 

एमआयडीसीच्या सूचनेनुसार काही क्षेत्र वगळले. निवडक शेतकऱ्यांच्या जमिनी वगळल्या नाहीत असे स्पष्टीकरण देसाई यांनी सभागृहात दिले.

 

विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एवढी मोठी जमीन मेक इन इंडियासाठी वगळणे

म्हणजे प्रत्यक्षात मंत्र्यांचं फेक इन इंडिया असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

तर, त्यांच्याच सुरात सूर मिसळत अजित पवार यांनीही या प्रकरणी देसाईंची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. भाजपपाठोपाठ

सेनेच्याही मंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे सरकार काहीसं बॅकफूटवर गेलं.

loading...

Top 10 News

Facebook Likebox