जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड
प्रियंका गांधी आता पिंपरीचिंचवडकरांची सून होणार आहेत.
ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. पण, या प्रियंका गांधी वेगळ्या आहेत.
पिंपरी चिंचवडचे भाजप सरचिटणीस आणि लॅपटॉपमॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या सारंग कामतेकर यांच्या होणाऱ्या सूनबाईंचं नाव आहे प्रियंका गांधी.
सारंग यांचा मुलगा समर कामतेकर याचा विवाह प्रियंका गांधी नावाच्या मुलीशी होत आहे. विशेष म्हणजे समर आणि प्रियंका यांचा प्रेमविवाह आहे.
पण नावातील साधर्म्यामुळं या प्रियंका गांधींच्या नावाची चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार रंगली.