Tuesday, 12 December 2017

अहमदनगरच्या अरणगावात तलाव फुटला; गावात पूरस्थिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

सलग तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे नगर तालुक्यातील अरणगाव येथील तलाव फुटला आहे. त्यामुळे गावात पूर आला आहे. तलाव फुटल्याने वाळुंज येथील परिट वस्तीतील 40 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. अरणगाव येथे पोलीस पथक, आर्मी पथकाला पाचारण करण्यात आले. पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

 

पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले मात्र, रात्री उशिरापर्यंत हे पथक दाखल न झाल्याने ग्रामस्थ पाण्यातच अडकून पडले होते़. सततच्या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाला होता. वस्तीच्या चारही बाजू पाण्याने भरल्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडता आले नाही. तलावाचे पाणी वस्तीपर्यंत पोहचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुळे काहीं जण उंचावर तर, काहींना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला.

 

दरम्यान तेेथे मदतकार्य पोहोचवण्यात आले असून, सर्व ग्रामस्थ सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News