Saturday, 21 July 2018

ड्रायव्हरशिवाय बस धावली अन् थेट गॅरेजमध्ये घुसली; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मराठी आणि हिंदी चित्रपटात आपण चालकाशिवाय गाडी चालल्याचं पाहिलंच आहे. मात्र, चित्रपटातील ही कथा प्रत्यक्षात उतरलीये, असं सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल.

 

मात्र हे घडलंय पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव बस स्थानकावर. बस स्थानकात उभी असलेली बच चालकाशिवायच धावू लागली.  

 

100 मीटरपर्यंत ही बस धावत गेली आणि एका गॅरेजमध्ये घुसली. हे सर्व घडलंय ते बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे, बसचालक गाडी सुरूच ठेवून खाली उतरले. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox