Sunday, 19 November 2017

सांगली येथील कुटुंब दहा वर्षांनंतर जातपंचायतीच्या जाचातून झाले मुक्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

एकीकडे डिजीटल इंडियाचा गाजावाजा होत असताना अजूनही महाराष्ट्रातील जनता जाती-पातीच्या विळख्यात अडकली आहे. सांगलीच्या तुंग गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला गावातील एका कुटुंबाने पाठिंबा दिला होता. यांना पाठिंबा देणाऱ्या चौगुले कुटुंबाला तुंग गावातील लोकांनी 10 वर्षासाठी वाळीत टाकले. पंचायतीच्या जाचाने या कुटुंबाचे जगणे मुश्कील केले आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात तेरा पंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली नजीकच्या तुंग गावात नंदिवाले समाज आहे. या समाजात पांडुरंग चौगुले यांचे कुटुंब राहते. या कुटुंबाला नंदिवाले समाजाच्या जात पंचायतीने वाळीत टाकले आहे. गेल्या 10 वर्षांपासून तुंग येथील पांडुरंग चौगुले यांच्या कुटुंबाला जात पंचायतीचा जाच होता. यामुळे या कुटुंबाला धार्मिक तसेच सार्वजनिक कार्याला उपस्थित राहू दिले जात नव्हते. समाजातील कौटुंबिक कार्यक्रम आणि कोणी मयत झाल्यासही जाण्यास या कुटुंबाला बंदी होती. त्यामुळे दहा वर्षे या कुटुंबाने जात पंचायतीचा त्रास सहन केला आहे.

मात्र, त्रास वाढल्याने अखेर या चौगुले कुटुंबीयांनी अंनिसच्या मदतीने नंदिवाले समाजाच्या तेरा पंचाविरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. गेल्या दहा वर्षांपासून चौगुले कुटुंब जात पंचायतीच्या दहशतीखाली जगत होतं मात्र अंनिसच्या पाठपुराव्यामुळे आणि चौगुले कुटुंबीयाच्या धाडसामुळे जात पंचायतीचा बुरखा फाटला आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News