Sunday, 19 November 2017

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांना गोड बातमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या दिवाळीचं वातावरण आहे. कारण सरकारनं त्यांना गोड बातमी दिली आहे.

 

या कर्मचाऱ्यांना आता सरकारी नियमानुसार पगार लागू होणार आहे. मंदिर समितीकडे काम करणाऱ्या 227 कर्मचाऱ्यांना हा लाभ होणार आहे.

 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी ही माहिती दिली. याआधी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन आणि उपोषण केलं होते.

 

अखेर सरकारनं त्यांची ही मागणी मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News