Saturday, 21 July 2018

रेल्वे रुळ उखडला, विजेचा खांबही ट्रॅकवर पडला; पुण्याकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, खंडाळा

 

मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा अपघाताने वाहतूक ठप्प झाली. वासिंदजवळ नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात ताजा असतानाच आता खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल आहेत.

 

या अपघाताने मुंबई पुणे रेल्वे वाहतूकच ठप्प पडली. ती कधी पूर्ववत होईल याचा अंदाज बांधणंही कठीण आहे. खंडाळ्याच्या गेट नंबर 29 जवळ मालगाडी ट्रॅकवरुन उतरली.

 

तर, 100 ते 150 मीटर लांबीचा ट्रॅक उखडला गेला. मुंबईकडून पुण्याकडे वाहतूक त्यामुळे टप्पच झालीय. मुंबई वरुण पुण्याला येणारी लोहमार्ग वाहतूक कल्याण आणि कर्जत स्टेशनवर रोखण्यात आली. डेक्कन एक्सप्रेस कोणार्क एक्सप्रेस कल्याण स्टेशनमध्ये थांबविण्यात आल्यात. मनमाडमार्गे गाड्या काढल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

loading...

Top 10 News

Facebook Likebox