Monday, 18 June 2018

रात्रीच्यावेळी कर्मचारी पेट्रोल पंप बंद करुन झोपले असता त्यांनी हवेत गोळीबार केला अन्...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज,  सातारा

 

साताऱ्यात कराड-तासगाव मार्गावरील पेट्रोल पंपावर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. रात्रीच्यावेळी कर्मचारी पंप बंद करुन झोपले असता पाच परप्रांतीय दरोडेखोर

दुचाकीवरुन आले.

 

त्यांनी हवेत गोळीबार करीत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणही केली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर भयभीत कर्मचाऱ्यांनी गल्ल्यातील  रोकड काढून दरोडेखोरांना दिली.

 

तर, 30 हजारांची रोकड आणि 5 मोबाईल घेऊन दरोडेखोर तासगावच्या दिशेनं पळाले. दरम्यान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीनं याबाबतची माहिती पोलिसांना

दिली. यावेळी पोलीस पथकानं गस्त घालून या पाचही दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली.

loading...

Top 10 News

Popular News

Facebook Likebox