वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यानच त्यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अनिल माधव दवे यांच्या निधनाच्या वृत्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
''माझ्या मित्राच्या अचानक झालेल्या निधनामुळे धक्का बसला आहे. दवे पर्यावरणाचे जतन करण्याच्या दिशेने प्रचंड उत्साही पद्धतीनं कार्य करत होते. काल संध्याकाळी
उशीरापर्यंत आम्ही महत्त्वाच्या धोरणांवर एकत्रित चर्चा करत होतो. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे'', अशी ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केले आहे.