Friday, 23 February 2018

यमुना नदीत प्रवासी बोट बुडाली, 15 जणांना जलसमाधी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीत प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 15  जलसमाधी मिळाली आहे. यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 12 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशच्या काठा गावातील ग्रामस्थांची शेती यमुनेजवळ आहे. काही ग्रामस्थ सकाळी यमुना नदीतून बोटीने शेतावर जात होते. त्यादरम्यान बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे ही बोट पाण्यात बुडाली. दुर्घटनेवळी बोटीतून 60 प्रवासी प्रवास करत होते. 

बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत असून ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News