Monday, 20 November 2017

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. डॉन दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली.

 

6.7 बिलियन डॉलरची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे समजते. म्हणजे भारतीय चलनानुसार दाऊद इब्राहिमच्या तब्बल 42 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली.

 

ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमचे हॉटेल आणि कित्येक घरं आहेत, ज्यांची किंमत हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या महिन्यातच ब्रिटन सरकारनं आर्थिक निर्बंधसंबंधीच्या यादीमध्ये दाऊदच्या नावाचा समावेश केला होता. यासंदर्भात भारतानं ब्रिटनला पूर्वीच अहवालदेखील सुपूर्द केला आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News