Sunday, 19 November 2017

कॅरेबियन बेटाला इरमा वादळाचा फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, फ्लोरिडा

 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इरमा वादळाचा तडाखा 10 कॅरेबियन देशांसह अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यालादेखील बसला आहे. या वादळामुळे कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 10 आणि फ्लोरिडात 4 जणांचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे.

 

फ्लोरिडामध्ये तब्बल 1 लाख 20 हजार भारतीय असून त्यांनी आता विस्थापितांसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडले आहेत. कॅरेबियननंतर इरमा वादळ आता उत्तर फ्लोरिडाकडे जाणार असून, त्यानंतर त्याची वाटचाल दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

वादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आल्याने ६० लाख लोक सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत. इरमा वादळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. इरमा वादळाची तिव्रता जास्त असल्यामुळे कॅरेबियन देश असो अथवा अमेरिकेतील फ्लोडिया या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भितीच वातावरण पसरले आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News