Saturday, 21 July 2018

कॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान; अणुबॉम्बपेक्षा दुप्पट विध्वंसक वादळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कॅरेबीयन

 

कॅरेबियन बेटांवर इरमा वादळाने थैमान घातले आहे. अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या वादळामुळे कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे. फ्रान्समध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत. नेदरलँडच्या सेंट मार्टीन बेटावर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बेटांवरील 90 टक्के इमारती कोसळल्या आहेत.

 

या वादळाच्या तडाख्यामुळे अवेक शहरे उधवस्त झाली आहेत. सेंट मार्टीन शहरात नागरीकांनी इलेक्ट्रॉनीक तसेच सोन्याची दुकांने लुटली. तसेच खाण्याच्या पदार्थांच्या दुकानांमध्येही नागरीकांनी लुट केली. या लुटीचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. यात येथील नागरीक टीव्ही सेट तसेच अनेक इवेक्ट्रॉनीक वस्तू घेवून जाताना दिसत आहेत.

 

या वादळामुळे वेनेझुएला, नेदरलँड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामुळे ज्या भारतीयांना फटका बसला आहे. अनिवासी भारतीयांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पावले उचलली असून, तिथल्या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

 

वादळाचा फटका बसलेल्या भारतीयांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी चारही देशातील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे समजते. या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. वादळामुळे बेघर झालेल्या नागरीकांना अन्न-पाणी तसेत तात्पुरती राहण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

इरमा वादळाची तीव्रता

- हे वादळ कॅटगरी पाचमध्ये येते
- हे वादळ धडकले तेव्हा वा-याचा ताशी वेग 260 किलोमीटर होता.
- क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाकडे वळले.
- ७ लाख कोटी वॅट्सएवढी चक्रीवादळात शक्ती...
- मॅसाच्युसेट्स विद्यापीठातील तज्ज्ञ केरी इम्यनुएल यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या एकूण अणुबॉम्बपेक्षा दुप्पट विध्वंसक हे वादळ आहे.
- वादळाची शक्ती सुमारे ७ लाख कोटी वॅट्स एवढी आहे.
- दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बसह सर्व प्रकारच्या वापरण्यात आलेल्या बॉम्बची क्षमता ३ लाख कोटी वॅट्स होती.
- श्रेणी-५ मधील इर्मा वादळ जोस व केटिया वादळांच्या मिश्रणातून तयार झाले आहे. त्यामुळे त्याची शक्ती वाढली आहे. ते जास्त विध्वंसक बनले आहे.

इरमा वादळामुळे झालेले नुकसान

- या वादळामुळे कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
- हजारो घरांचे नुकसान
- बेटांवरील 90 टक्के इमारती कोसळल्या
- फ्लोरिडाला किनारपट्टीवरील 1 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले
- फान्सच्या ताब्यातील सेंट मार्टिनचे सर्वाधिक नुकासन
- रन वे चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विमान सेवा कोलमडली आहे.
- जल वाहतूकही ठप्प झाली आहे.
- वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


loading...

Top 10 News

Facebook Likebox