Saturday, 21 July 2018

मुलाला शाळेत सोडलं अन् अवघ्या 15 मिनीटानंतरचं त्याची हत्या झाल्याची बातमी आली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, गुरगाव

 

शाळेत मुलं सुरक्षित आहेत की नाहीत यावरच आता प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीच्या गुरुग्राममध्ये रायन शाळेत घडलेल्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे.

 

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षाच्या विद्यार्थ्याची शाळेतच हत्या करण्यात आली. निरागस प्रद्युम्नचा गळा चिरून खून करण्यात आला.

 

प्रद्युम्नच्या वडिलांनी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी त्याला शाळेत सोडलं होतं. पण 8 वाजून 10 मिनिटांनी प्रद्युम्नची हत्या झाल्याचा फोन त्याच्या वडिलांना करण्यात आला.

 

शाळेच्या शौचालयात त्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. संतप्त पालकांनी शाळेत आंदोलनही केलं. याप्रकरणी शाळेच्या बसच्या ताफ्यातल्या एका कंडक्टरला अटक करण्यात आली. त्यानंच या निरागस विद्यार्थ्याचा गळा चिरल्याचा आरोप आहे. तसेच लैंगिक शोषण झालंय की नाही या दिशेनंही पोलीस तपास करत आहेत.

loading...

Top 10 News

Facebook Likebox