Sunday, 19 November 2017

मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भूकंपाचा थरार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मेक्सिको

 

मेक्सिकोमधील पिजीजियापनमध्ये भूकंपाचा मोठा धक्क बसला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने येथील जमीन दुभंगली आहे. भूकंपादरम्यान त्सुनामी येण्याचा इशारा तज्ञांकडून देण्यात आला आहे.

 

पिजीजियापनपासून 123 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भूकंपामुळे अमेरिकेसह मेक्सिकोमध्ये त्सुनामीचा अंदाज वर्तविण्यात आाला असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपाचे धक्के ग्वटेमाला, एल सल्वाडोर, कोर्टारिका, निकारागुआ, पनामा, होन्डुरास आणि इक्वाडोरमध्ये जाणवले.

 

मेक्सिकोच्या नागरी संरक्षण एजन्सीच्या माहितीनुसार मेक्सिकोमध्ये झालेला हा भूकंप हा 1985 नंतरचा मोठा भूकंप आहे. 1985 च्या भूकंपात अनेक इमारती पडल्या होत्या तसंच शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News