Sunday, 24 June 2018

स्वप्नातली ‘बुलेट’ प्रत्यक्षात येणार !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, गुजरात

  

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवारी साबरमती येथे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या भूमिपूजनासाठी उपस्थित होते.

 

भारतासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 508 किलोमीटरचा मार्ग असलेला हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

यावेळी जपानच्या पंतप्रधानांनी हिंदीतून भाषणाची सुरुवात केली. भारताच्या रेल्वेसाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

 

काय आहेत या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये –

 

-    अहमदाबाद मुंबई अंतर रेल्वेने पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात मात्र, आता मुंबई – अहमदाबाद प्रवास अवघ्या 2 तास 58 मिनीटांत होणार आहे.

-    बुलेट ट्रेन दिवसभरात 36 हजार प्रवाशांची ने-आण करु शकणार आहे.

-    दहा डब्यांच्या बुलेट ट्रेनमधून एकावेळी 750 जण प्रवास करु शकतात.

-    या बुलेट ट्रेनचे तिकीट 2700 ते 3000 रुपयांपर्यंत असणार आहे.

-    मुंबईतील बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीची जमिन देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

-    बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी एकूण 1 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

-    मुंबई – अहमदाबाद या 508 किमीअंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

-    156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून तर, 351 किलोमीटरचा मार्ग गुजरातमधून असणार आहे.

-    मुंबई, ठाणे, विरार, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद अशा प्रमुख शहरांचा यात समावेश असणार आहे.

-    बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन असतील, त्यापैकी महाराष्ट्रातील 4 स्टेशनवर ही ट्रेन थांबणार आहे.

-    7 किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाणार असून ताशी 350 किमी धावण्याची क्षमता या बुलेट ट्रेनची असणार आहे.  

loading...

Top 10 News

Popular News