Monday, 18 June 2018

मी भाजप सरकार पडू देणार नाही; रामदास आठवलेंचा निर्धार

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

शिवसेनेनं भाजपचा पाठिंबा काढू नये.  पाठिंबा काढल्यास राज्यातील सरकार पडू शकत नाही. मी भाजप सरकार पडू देणार नाही असा निर्धार केंद्रीय सामाजिक न्याय

राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.

 

देशातील आरक्षण 50 वरून 75 टक्क्यांवर करा.  मराठा समाजाला 16 टक्के तर इतरांना 9 टक्के द्यावे. याबबात संसदीय मंडळात भूमिका मांडल्याचे आठवले म्हणाले.

भाजप सरकार दलित आणि मुस्लिमांविरोधात नाही. देशातील मुस्लिमांचे संरक्षण करण्यास सरकार सक्षम आहे.

 

राजू शेट्टी यांनी एनडीए मधून बाहेर पडू नये असे मतही त्यांनी मांडले.

 

सदाभाऊ खोत यांची पक्षातून केलेली हकालपट्टी हा त्यांचा वैक्तीक प्रश्न असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

 

तसेच रामदास आठवले यांनी एकला चलो चा नारा दिला आहे.  

 

आठवलेंनी आरपीआय कार्यकर्त्यांना स्वबळावर लढायाचे आदेश दिले. मित्रपक्षाच्या भरवश्यावर कार्यकर्त्यांनी अवलंबून राहू नका.  आता आरपीआयने स्वबळाची तयारी

सुरू करावी आसा आदेश आठवलेंनी आरपीआय कार्यकर्त्यांना दिला. 

loading...

Top 10 News

Popular News