Thursday, 21 June 2018

डोक्यावर अक्षता पडण्याआधी लग्नमंडपातच नवरदेवचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

डोक्यावर अक्षता पडण्याआधी लग्नमंडपातच नवरदेवचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे.  

 

सांगलीतील मिरजमध्ये आज सकाळी ही घटना घडली. रवींद्र मदन पिसे (वय 27) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. हृदविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.

 

या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

 

मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी ठरविण्यात आला होता.

 

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ पार पाडला. शनिवारी मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता.

सकाळी व-हाडासह सर्व नातेवाईक मंगल कार्यालयामध्ये दाखल झाले होते.

 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता.

त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. नऊच्या दरम्यान

डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.

 

मंगल  कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरु होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे

वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. त्यांना शोक अनावर झाला.

 

या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. 

loading...

Top 10 News

Popular News