Wednesday, 20 June 2018

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दर्शवली राजीनाम्याची तयारी

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली. एमआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैंकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी राज्यानाम्याची तयारी दर्शवली.

 

राजीनामा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली.

 

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला येथील एमआयडीसीने संपादित केलेली 400 एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

loading...

Top 10 News

Popular News