Wednesday, 20 June 2018

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या काही वेळ आधीच आरोपी सुनील शितप पळाला, पाहा सीसीटीव्ही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील घाटकोपरमधल्या साईसिद्धी इमारत दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्रच्या हाती लागले आहे. यात आरोपी सुनील शितप घटनास्थळाहून गेला आणि अवघ्या 5 मिनिटांतच इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळण्याआधी नागरिकांनी आरडाओरडा केला. इमारत कोसळण्याची त्यांना चाहूल लागली आणि लगेचच ही इमारत कोसळली.


सीसीटीव्हीमध्ये आपण पाहू शकता 25 जुलै, 2017 ला सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी सुनील शितप इमारतीबाहेर येतो. आपल्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो.

 

त्यानंतर 10 वाजून 22 मिनिटांनी इमारतीबाहेर लोकं जमतात. त्यांना इमारत कोसळण्याची चाहूल लागल्यानं ते इमारतीतल्या रहिवाशांनी बाहेर पडण्यासाठी आरडाओरडा करतात. मात्र, 10 वाजून 24 मिनिटांनी ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. आणि धुराळा उडताना दिसतो.


25 जुलैला घडलेल्या या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. त्याला सुनील शितप जबाबदार होता. इमारतीच्या तळमजल्यावर त्याचं नर्सिंग होम होतं. परवानगीशिवाय त्याचं नूतनीकरण सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळल्याचा आरोप आहे. निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा हा सुनील शितप मात्र या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला.

loading...

Top 10 News

Popular News