Wednesday, 20 June 2018

रात्रभर सुरू राहणार दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्स पण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानं आता रात्रभर सुरू राहणार आहे. दुकाने आणि आस्थापना कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आली.

 

या निर्णयानं मुंबईत नाइट लाइफ सुरू राहील असं नाही. कारण मुंबईसह राज्यभर अनेक बंधनेही सरकारने टाकली आहेत. कोणत्या आस्थापना किती वेळ सुरू ठेवायच्या याचा अधिकार पोलीस विभागाला असणार आहे.

 

शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कँटिनची व्यवस्था करणे अनिवार्य असणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही आस्थापना मालकांची असणार आहे. तसंच प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

Popular News