Thursday, 21 June 2018

धनंजय मुंडेनी आरोप केलेल्या ‘त्या’ घोटाळ्याबाबत धक्कादायक माहिती उघड

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या एमआयडीसीच्या जमिनीत घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर

येते आहे.

 

ती म्हणजे, सरकारने शेतकऱ्यांच्या या जमिनी परस्पर बळकावल्या होत्या आणि आता त्याच जमिनींचे दर पाचपट करून विकले जात आहेत.

 

सरकारने एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांकडून जमिनी मागितल्या. मात्र, शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्याने सरकारने त्यावर आरक्षण लागू केले.

 

यानंतर शेतकऱ्यांनी या जमिनी बिल़्डरांना कवडीमोल दरात विकल्या आणि सरकारने त्यावरील आरक्षण रद्द केले.

 

आता मात्र या जमिनींची पाचपट दरानं विक्री होत आहे. आता शेतकऱ्यांच्या हाती जमिनीही राहिल्या नाहीत आणि त्यांच्या मुलांना नोकरीही नाही. त्यामुळे सरकारच

शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असल्याचे दिसत आहे.

loading...

Top 10 News

Popular News