Wednesday, 13 December 2017

नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची राहत्या घरी आत्महत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंजली श्रीवास्तव नावाच्या नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. 29 वर्षीय अंजलीने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. अंजलीचे नातेवाईक तिला वारंवार फोन करत होते, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी घरमालकाशी फोनवरुन संपर्क साधला.

 

घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घरमालकाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला.

 

अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. मात्र अंजलीने आत्महत्या कधी आणि का केली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:54 +0000 2017

आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगावास - https://t.co/3RoV9WdXQt https://t.co/RYOaAd4Nu8
Jai Maharashtra News
Tue Dec 12 16:02:01 +0000 2017

सामान्यांना आरोग्यसेवेचा अधिकार नाही का? - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/Q3SO1FBjda