Thursday, 23 November 2017

आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, गोवा


आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवायला गेले आणि नदीत पडले. गोव्याच्या सावर्डेमध्ये ही दुर्घटना घडली.

 

पोर्तुगीजकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तरी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.


या पूलावरील दुर्घटनेत 50 लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सावर्डेचा हा पूल जुना असल्यानं दुर्घटना टाळण्यासाठी तो बंद ठेवण्यात आला होता.

 

पण गुरुवारी एक युवक आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याला वाचवण्यासाठी काहीजण त्या पुलावर गेले. अचानक आलेल्या जमावाच्यां वजनानं पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

शून्य प्रहर

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgf1KJQhk1mZNUkgMVl5lGW" frameborder="0" allowfullscreen></iframe>

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Nov 23 04:48:35 +0000 2017

फ्लॅट बुक करुनही फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने डी. एस. कुलकर्णींविरोधात तक्रार - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/fu8Lfet5Rf
Jai Maharashtra News
Thu Nov 23 04:44:34 +0000 2017

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ - https://t.co/2fWgZbAtWu https://t.co/zNQZDHZYr3

लक्षवेधी

<iframe width="260" src="https://www.youtube.com/embed/videoseries?list=PLzWrgvMWREbgLyxujHqPxEC-jBvnolecm" frameborder="0" allowfullscreen></iframe>