Monday, 21 January 2019

लगबग नवरात्रोत्सवाची!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राज्यभरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली असून घटस्थापनेसाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहेत.

शक्तीचे प्रतीक असणारा नवरात्र उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना करण्यात येते. काही जण मातीच्या घटाबरोबरच देवीच्या प्रतिकात्मक मूर्तीचीदेखील प्रतिष्ठापना करतात.

उद्यापासून (10 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठे सजली आहेत. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. 

घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे.

देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे.

 हल्ली नऊ दिवसांसाठी निरनिराळ्या रंगांचे पेहेराव तरुणाई करते. त्यासाठी बरेच पैसेही खर्च करते. बाजारात एम्ब्रॉयडरी केलेल्या चनिया-चोली, विविध प्रकारचे घागरा चोली, मुन्नी स्टाईल घागरा-चोली, मेटलचे दागिने, मुलांसाठी केडीयू ड्रेसेस असे भरपूर प्रकार उपलब्ध झाले आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य