Wednesday, 16 January 2019

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूरात वसलेली अंबाबाई अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या या अंबाबाईचं देऊळ कोल्हापूरच्या मध्यभागी आहे.

हे एक जागृत देवस्थान असुन नवसाला पावणारी देवी अशी अंबाबाईची ख्याती आहे. कधी काळी मोघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, अशी या देवळाची दंतकथा आहे.

देवीची मूर्ती दगडी असून रत्नजडित खड्यांनी मढवलेली आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग असून ४० ही दगडी मूर्ती किलोग्रॅम वजनाची आहे.   

loading...