Friday, 18 January 2019

हजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर 

 

देवीच्या एकूण साडेतीन शक्तिपीठांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रतलं एक पूर्णपीठ म्हणून ओळखलं जाणारं देवस्थान म्हणजे उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर.

 

महाराष्ट्रातची कुलस्वामिनी मानली जाणारी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचं देवस्थान जागृत असून नवसाला पावणारं मानलं जातं. तुळजापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले आहे.

 

फार पुर्वी इथे घनदाट अरण्य असून त्या भागात चिंचेची खूप झाडे होती. म्हणुनच त्याला चिंचपूर असंही म्हटलं जायचं. तीन फुटाची असलेली तुळजाभवानीची मूर्ती स्वयंभू आहे.

 

तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या अष्टभुजांमध्ये बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाचं मुंडकंही आहे.

 

तुळजापूरला कसे जाल?

 

बालाघाट डोंगररांगामध्ये वसलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यापासुन 22 किमी अंतरावर तुळजापूर गावात आहे. तुळजापूरला विविध मार्गांनी जाता येतं.

 

मुंबईहून तुळजापूरला राज्य परिवहन मंडळाची बस किंवा खासगी वाहनानांचेदेखील पर्याय उपलब्ध आहेत. मुंबईपासुन तुळजापूर 442 किलोमीटरवर असून, मुंबईहून तुळजापूरला बसने जाण्यासाठी साधारण सात तास लागतात.

 

तर पुण्यापासुन तुळजापूर 291 किलोमीटरवर आहे. त्याशिवाय विमानाने जायचे असल्यास पुणे विमानतळ तुळजापूरचे नजिकचे विमानतळ आहे. पुण्याहून रेल्वे किंवा बसने तुळजापूरला जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.  

loading...