Wednesday, 19 December 2018

I Instant recipes

नवरात्री स्पेशल रेसिपी - पीनट लाडू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे, या उत्सवात 9 दिवस देवीची आराधना केली जाते, तसेच 9 दिवस उपवासही केला जातो यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सोपी आणि झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही तुम्ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की बनवून पाहा.   

साहित्य 

  • कच्चे शेंगदाणे - 1/2 कप
  • खजूर - 8 किंवा चवीनुसार
  • वेलची पावडर - ½ टी स्पून
  • तूप - 1 टेस्पून
  • मनुका

कृती

  • प्रथम पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या, त्यानंतर शेंगदाणे थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवा.
  • पॅनमध्ये तूप टाका त्यात बारीक केलेले खजूर, शेंगदाणे पावडर आणि वेलची पावडर घाला, हे मिश्रण मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रण ठंड झाल्यावर त्याचे लाडूच्या आकाराचे छोटे गोळे करा.
  • प्रत्येक लाडूवर सजावटीसाठी एक एक किशमिश लावा.
loading...

Top 10 News

राशी भविष्य