Monday, 23 October 2017

I Instant recipes

चीज कॉर्न रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

चीज म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि पिझ्झा किंवा सॅंडवीच आठवतात. मग ते डबल चिज असेल तर उत्तमच. म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चीज कॉर्न रोल. आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या कणसाच्या दाण्यांपासून तयार केलेले चीज कॉर्न रोल.

साहित्य:

 चीज - 1 वाटी

हिरवी चटणी - 2 टे. स्पून

काळीमिरी पूड - 1 टे. स्पून

साबुदाण्याचे पीठ - 1 वाटी

स्मॅश केलेला बटाटा - 1 वाटी

कॉर्न - 1 वाटी

मीठ - चवीनुसार

तेल - आवश्यकतेनुसार

 

कृती:

 प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.

उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल

पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.

Top 10 News