Wednesday, 23 January 2019

आतंकवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात पुण्यातील जवान शहीद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद झाले आहेत. मेजर शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या 2 स्फोटांमध्ये सैन्यातील मेजर शशीधरन नायर हे शहीद झाले आहे. त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. मेजर नायर यांचे पार्थिव सकाळी 11 वाजता विमानाने पुण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य