Wednesday, 23 January 2019

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ मीरा सन्याल यांचे निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बँकिंग क्षेत्रातील आपली उत्कृष्ट वाटचाल सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या मीरा सन्याल यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले आहे. मीरा सन्याल यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

सन्याल यांनी राजकारणात प्रवेश करताना आपलं 30 वर्षांचं उज्ज्वल बँकिंग करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोची येथे जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन अॅम्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट फायनान्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

सन्याल यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे सन्याल यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. देशाने देशाने एक चांगला अर्थतज्ज्ञ आणि चांगलं व्यक्तिमत्व गमावलं आहे, असे भावनिक ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य