Wednesday, 23 January 2019

बेस्टचा संप चौथ्या दिवशीही सुरूच

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे. गुरुवारी (10 जानेवारी) महापौर, पालिका आयुक्त आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आणि मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवारी संपच सुरूच आहे. बेस्ट कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौरांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे कामगार संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये महापालिकेतील विलीनीकरणाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. कामगारांचे पे ग्रेडबाबत पैसे नसल्याचे कारण देत लेखी आश्वासनही दिले नाही. उद्धव ठाकरे तोडगा काढूया, असे म्हणत होते. त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही.

या संपात रिक्षा-टॅक्सी, खासगी बस सेवा आपले खिसे भरून घेत आहेत. बेस्ट उपक्रमातील 30 हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य