Sunday, 20 January 2019

भाचीची बलात्कार करून हत्या, नराधमाला अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पुण्यातल्या धायरी इथे एका अल्पवयीन तरुणीवर मावशीच्या नवऱ्याने बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीवर बलात्कार करुन तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.  

वैष्णवी भोसले (वय १७, रा. धायरी) असे मृत अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. शवविच्छेदनाच्या अहवालावरुन ही बाब उघड झाली. सिंहगड पोलिसांनी 48 तासांत आरोपीला अटक केले आहे.

मात्र या घटनेमुळे धायरी परिसरात खळबळ उडाली आहे. आई वडील घरी परतल्यावर त्यांना वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनचा अहवाल आला असून वैष्णवीवर बलात्कार करुन तिचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचं निष्पन्न झाले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य