Friday, 14 December 2018

दुष्काळ पडला तर जनावरांना पाहुण्यांकडे पाठवा - राम शिंदे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल होते. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलंय.

''दुष्काळ पडला तर जनावरांना पाहुण्यांकडे पाठवा असा अजब सल्ला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नगरच्या पालकमंत्र्यांनी दिला आहे. राम शिंदेंच्या वक्तव्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय अशी प्रतिक्रिया राम शिंदेंनी दिली.तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी बुधवारी दुपारी 1 वाजता पालकमंत्री पाथर्डी इथल्या विश्रामगृहावर बुधवारी आले होते, यावेळी हा प्रकार घडला. पालकमंत्र्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य