Friday, 14 December 2018

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: ख्रिश्चिअन मिशेलने लाच दिल्याचा आरोप नाकारला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हेलिकॉप्टर घोटाळयातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने संपुआ सरकारमधील कुठलाही नेता किंवा संरक्षण मंत्रालयातील कुठल्याही अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. पण सल्लामसलत फी म्हणून ऑगस्ट वेस्टलँडकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून ही हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आली होती.

मूळ ब्रिटीश नागरिक असलेल्या ख्रिश्चिअन मिशेलचे मंगळवारीच सौदी अरेबियाने कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारताला प्रत्यार्पण केले. त्याला सीबीआय न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ख्रिश्चिअनचे हस्ताक्षर असलेल्या चिठ्ठयांमध्ये पैसे दिल्याचा उल्लेख आहे पण आता त्याने मी डिस्लेक्सिक आजाराचा रुग्ण असून लिहू शकत नाही असा दावा केला आहे. ज्या चिठ्ठयांमध्ये राजकीय नेते आणि नोकरशहांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत त्या गुइडो हास्चके या युरोपियन मध्यस्थाने लिहिल्याचा दावा मिशेलने केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य