Sunday, 20 January 2019

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, काय आहेत आजचे दर ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. या दर कपातीनुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 20 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

इंधन दरवाढीत कपात करण्यात आलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 82.42 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 75.15 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या 2 आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे.

इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. 2 महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. मात्र आता ते काही प्रमाणात स्वस्त झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य