Monday, 21 January 2019

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग याचं पुण्यात निधन झाले आहे.  वयाच्या 79व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’. लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात आहेत. 

लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचे जन्मापासूनचे आयुष्य मुंबईत गेले. 

sakharambaindar-lalansarang.jpg

लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले.

 

athchakra-lalansarang.jpg

विविध नाटके व भूमिकांतून त्यांनी रंगभूमीवर स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. काही नाटकांमुळे रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री अशी ओळखही त्यांना मिळाली. अभिनयापासून सुरू झालेला ज्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्यां ते हॉटेल व्यावासायिक, उद्योजिका असा झाला, त्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत.

अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तके  लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढले़  स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याची त्यांना आवड आहे. पुण्यात ‘मासेमारी’ हे हॉटेल उघडले आहे. उत्तम गोमंतकीय पद्धतीने बनविलेल्या माशाच्या विविध प्रदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. या हॉटेलमधील रेसिपी स्वत: लालन सारंग यांनी तयार करुन दिली असून त्यानुसारच ते पदार्थ बनविले जातील. याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य