Monday, 21 January 2019

ऐन भाऊबीजेच्यादिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि वाणगाव स्टेशन दरम्यान रात्री 11 च्या सुमारास मालगाडीला भीषण आग लागली होती. डहाणू- वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली होती. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्यानं मालगाडीला आग लागली होती.

काही वेळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी या आगीत मालगाड़ीतील दोन डिझेलचे डब्बे जळून गेले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

WhatsApp_Image_2018-11-09_at_9.47.11_AM.jpeg

 

तरी याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या अप आणी डाउन या दोन्ही मार्गाच्या वाहतुकीवर झाला आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र मेल काही वेळा पुर्वी पास करण्यात आली आहे. तर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या डहाणू पलिकडील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा वाणगाव पासून मुंबईकडे काही वेळात सुरू करण्यात येणार आहे.

 

WhatsApp_Image_2018-11-09_at_9.47.13_AM.jpeg

 

WhatsApp_Image_2018-11-09_at_9.47.12_AM.jpeg

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य