Friday, 18 January 2019

दिवाळी पाडवा: जाणून घ्या 'याचे' महत्व

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बळीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.

परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. मनाचा खेळ वेगळा झाला असून, एकमेकांत समज-गैरसमजांमुळे मनाला व्याधी होताना दिसते. पुराणकालीन हे संस्कार, प्रथा जर पाळल्या तर हे अनर्थ टळण्यास मदत होते आणि हाच विचार शास्त्राचा असावा.
पाडव्यामध्येही प्रेम आणि सुविचार यांचा मेळ शास्त्राने केला असून, आज त्याची आवश्यकता अधिक वाटते.

पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. बदलत्या काळातल्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत पती-पत्नीच्या नात्यांचे आयाम बदलत चालले आहेत आणि तरीही पाडव्याच्या ओवाळणीमागची भावना मात्र तशीच बावनकशी सोन्यासारखी अस्सल लखलखीत स्नेहाची, प्रेमाची आहे. ती तशीच टिकून राहावी म्हणून एकमेकांना आहोत तसं स्वीकारणं, एकमेकांच्या सामर्थ्यांविषयीचं कौतुक करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना गृहीत न धरणं, एकमेकांना अवकाश देणं, घरामध्ये काही मूल्य आणि उद्दिष्टं यांची एकत्रित जपणूक करणं अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.

वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आणि पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य