Tuesday, 20 November 2018

#INDvWI टी-20 मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतविरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामना भारताने वेस्ट इंडिजवर 71 धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी केली आहे. भारतीय संघाच्या फलंदाजासह गोलंदाजांनीही केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना विजय मिळवला आहे. १९६ धावांचा पाठलाग करताना विंडीजला केवळ ९ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारता आली.

टी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. मात्र या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

#INDvWI टी-20 मध्ये रोहितने रचला नवा विक्रम, विराटला टाकलं मागे 

loading...

Top 10 News

राशी भविष्य