Friday, 14 December 2018

'या' हल्ल्याप्रकरणी नक्षलवाद्यांचं स्पष्टीकरण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

छत्तीसगढमध्ये झालेला हल्ला पत्रकारांना लक्ष्य करून नव्हता,' अशी सारवासारव आता नक्षलवाद्यांनी केली आहे.

30 ऑक्टोबर रोजी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दुरदर्शनचे कॅमेऱामन अच्युतानंद साहु यांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पत्रकारांना टार्गेट करण्यासाठी होता असा आऱोप पोलिसांनी केला होता. मात्र हा हल्ला मीडियाला टार्गेट करण्यासाठी नव्हता अस स्पष्टीकरण नक्षलवाद्यांनी दिले आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.

'पोलिसांसोबत दूरदर्शनची टिम आहे, पत्रकार आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. चकमक सुरु झाल्यावर या फायरींगमध्ये सापडून साहू यांचा मृत्यू झाला. ही अंत्यत दु:खाची बाब असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. जाणीवपुर्वक पत्रकारांना मारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र या घटनेनंतर राज्य सरकार आमच्याविरुध्द खोटा प्रचार करत आहेत.' असा आरोपही या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला.

'पत्रकार आमचे शत्रू नाही तर मित्र आहे,साहू यांच्या मृत्युचं आम्हाला दु:ख आहे. या घटनेनंतर पोलिसांसोबत पत्रकारांनी येवू नये तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत राहू नये' अशा सूचनाही या पत्रकात देण्यात आल्या आहेत.

 

new.PNG

new.1.PNG

loading...

Top 10 News

राशी भविष्य