Friday, 18 January 2019

Paytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ई-वॉलेट कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या कंपनीचा डेटा चोरी करुन २० कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलासह 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हे आरोपी नोएडा इथल्या पेटीएमच्या डिजिटल पेमेंटचे प्रमुख कर्मचारी असून अटक केलेली महिला विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी आहे.

या चार कर्मचाऱ्यांनी विजय शर्मा यांच्या कंपनीची वैयक्तिक माहिती आणि गोपनीय माहिती चोरली, तसंच आकडेवारी लीक करणे आणि ती माहिती जाहीर करण्याची धमकी दिली. डेटा परत मिळवण्यासाठी विजय यांच्याकडून 20 कोटी रुपयांची मागणीही केली.

कंपनीचे मुख्यालय नोएडामध्ये आहे आणि कंपनीच्या या तीन कर्मचाऱ्यांना  सेक्टर 20 पोलीस स्थानकातील पथकाने अटक केली आहे. गौतम बुद्ध नगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी सांगितले की विजय शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीचा काही डेटा चोरला असून आता ते ब्लॅकमेल करत आहेत. ते लोक ती माहिती जाहीर करण्याची धमकी देत त्यांच्याकडून २० कोटींची खंडणी मागत होते, असे या तक्रारीत म्हटले आहे. नोएडा पोलिसांनी सांगितले की, या तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून चोरीला गेलेला डेटा तपासला जात आहे. या प्रकरणातला चौथा आरोपी मात्र फरार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य