Monday, 21 January 2019

"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध!"- प्रकाश आंबेडकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

“वंदे मातरमला ‘एमआयएम’चाच नव्हे तर आमचा पण विरोध आहे. वंदे मातरम राष्ट्रगीत नाही त्यामुळे त्याची कुणावरही सक्ती करता कामा नये.” असं विधान करून प्रकाश आंबेडकर यांनी वंदे मातरम या गीताला विरोध दर्शवलाय. मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या कार्यक्रमासाठी आज प्रकाश आंबेडकर परभणीमध्ये हजर होते. यावेळी पत्रकार परिषदेत उत्तरं देताना आंबेडकर यांनी ‘वंदे मातरम’ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

‘जन गण मन’ हे अधिकृत राष्ट्रगीत असताना आणखी पर्यायी दुसरे गीत हवे कशाला? भाजपवाल्यांचा राष्ट्रगीतावर भरोसा नाही का? असा सवालही आंबेडकर यांनी केला.

पुढे आंबेडकर म्हणाले, काँग्रेस पक्षाला आमच्याशी मैत्री करायची असती तर आतापर्यंत हालचाल झाली असती. दोन महिन्यात दिल्लीतून कोणतेही संकेत नाहीत याचा अर्थ कॉंग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नाहीत त्यामुळे लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

तर आमच्यासोबत असलेल्या धनगर समाजाला राष्ट्रवादी नकोय त्यामुळे राष्ट्रवादी सोबत युती करायला आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिलाय.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य