Friday, 18 January 2019

#METOO मोहिमेबद्दल सिंधूताईंची प्रतिक्रिया...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सध्या जगभरात #MeToo मोहिमेच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातील महिला आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडत आहेत. 

या मोहिमेबाबत अनेक दिग्गजांना प्रश्न विचारण्यात आले ज्यात काहींनी नकारात्मक तर काहींनी पाठींबा दर्शवला. ह्याबाबत अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळांनाही प्रश्न विचारण्यात आला. "ज्यावेळी अत्याचार झाला, त्याचवेळी या महिला का बोलत नाहीत, असा सवालच" सिंधुताईंनी विचारला. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील एका पतसंस्थेच्या वर्धापनदिनी त्या बोलत होत्या.

"या प्रकरणांमुळे दोषी नसलेल्या व्यक्तींनादेखील शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कोणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसंच ज्याच्यावर आरोप केले जातात, तोसुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे," असं सिंधुताईंनी म्हटलं. "अत्याचारासाठी शिक्षा ठरलेली आहे. त्यामुळे महिलांनी योग्य वेळी आवाज उठवावा," असं आवाहन त्यांनी केलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य