Friday, 18 January 2019

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सध्या लग्नांचा मौसम सुरु असतानाच आता बाॅलिवूडच्या आणखी एका जोडप्याने लग्नाची तयारी दर्शवली आहे. 

बाॅलिवूडचे बाजीराव रणवीर सिंह आणि मस्तानी दीपिका पादूकोन यांच्या लग्नाची चर्चा होतच होती. ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. 

अखेर त्या दोघांनी या चर्चेला पूर्णविराम दिले आहे. त्यांनी ट्विटरवर आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे.

14 आणि 15 नोव्हेंबर ही लग्नाची तारीख ठरली आहे. मात्र लग्नाचे स्थान गुलदस्त्यातच ठेवले आहे. या दोघांनीही ही बातमी सोशल मीडियावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोस्ट टाकून सर्वाना सांगितलीये. असंख्य चाहत्यांचे आभार मानताना त्यांनी म्हटलं की, ‘तुमचे प्रेम, आशीर्वाद घेऊन आम्ही दोघे प्रेम, निष्ठा, मैत्री व सहजीवनाचा हा नवा अध्याय सुरू करणार आहोत.’ दोघांच लग्न हे इटलीमध्ये असलेल्या लेके कोमो परिसरात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य