Monday, 21 January 2019

काश्मीरमध्ये 3 अतिरेक्यांना कंठस्नान, 2 जवान जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे.

तब्बल 5 तासांच्या चकमकीनंतर या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे, या चकमकीत 2 जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

कुलगाम जिल्ह्यातील लारनू येथे काही अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी या संपूर्ण परिसराची घेराबंदी करत अतिरेक्यांचा शोध सुरू केला होता.

यावेळी अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने जवानांनाही उलट गोळीबार करावा लागला, यावेळी 2 जवानांना गोळी लागल्याने त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर जवानांनी आक्रमक कारवाई करत 3 अतिरेक्यांचा खात्मा केला, दरम्यान या परिसरात आणखी 4 ते 5 अतिरेकी लपून बसले असून त्यांचा शोध सुरु आहे.

या परिसरात येणाऱ्या वाहनांनाही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसेच अफवांना आवर घालण्यासाठी कुलगाममधील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य