Friday, 18 January 2019

विमानतळावर नवरात्रोत्सवाचा 'असा' जल्लोष!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो हे तर सर्वांनाच्याच ऐकण्यात आहे. तसंच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अहमदाबाद विमानतळावर चक्क गरबा खेळला गेला.

अहमदाबाद सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून गरबा खेळून उपस्थित प्रवाशांची मने जिंकली. विशेष, म्हणजे, येथील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही टर्मिनल्सवर फ्लॅश मॉब गरबा खेळण्यात आला. नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमध्ये प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी हा चांगला मार्ग होता. यावेळी येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांनीही याचा आनंद लुटला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य