Monday, 21 January 2019

मुंबईला 'या' दुधाचा पुरवठा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईला भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.

सायन पनवेल हायवेवर वाशी चेक नाक्याजवळ काल रात्री अन्न आणि औषध प्रशासनातर्फे दुधाच्या गाड्या आणि दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात आली.

मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 2 दुधाच्या टँकरमधील दूध हे भेसळयुक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. अमोनियम सल्फेट आणि माल्टोडेस्ट्रीन ही रसायनं दुधात मिसळण्यात आल्याचं उघड झालंय. यातील एक टँकरमध्ये अग्रवाल डेअरीचे राजयोग दूध आणि दुसऱ्या टँकर मध्ये हेरिटेज फूड कंपनीचे दूध होते.

तब्बल तीन हजार सहाशे लीटर भेसळयुक्त दूध या टँकरमध्ये सापडले असून आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य