Friday, 18 January 2019

लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांकडून माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे, यासंदर्भात दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे आणि संघटक रामलाल यांच्यात काल रात्री चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून 'जय महाराष्ट्र'ला मिळाली आहे.

काल रात्री उशिरा लिला पॅलेस हॉटेलमध्ये यासंदर्भात बैठक झाली. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल तसंच एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत, असं ठरल्याची माहिती मिळते.

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना जातीनिहाय प्रतिनिधित्व देण्याचा तर रिपब्लिकन पक्षाला 1 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर, भूपेश थुलकर यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही ठरल्याचं समजतंय. भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीत पोहचल्यानंतर या विस्ताराला मान्यता मिळे, अशी माहितीही सूत्रांनी दिलीये. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य