Friday, 18 January 2019

प्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तसंच आरएसएसकडून शस्त्र जमा करुन न घेतल्यानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कारवाई न झाल्यास कोर्टात धाव घेऊ असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.

स्वातंत्र्याआधी देशात राजे-महाराजे मोठ्या प्रमाणात शस्त्रे बाळगत असत. आता राजे-महाराजांचा जमाना इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या राज्यात एखाद्या संघटनेला मोठ्या प्रमाणात शस्त्रे कशी बाळगता येऊ शकतात? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य